सावधान ; वीजबिल भरण्यासाठी तुम्हाला SMS आला असेल तर सावध व्हा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ जून । तुमच्या कामाची आणि अत्यंत महत्त्वाची तुम्हाला सतर्क करणारी बातमी आहे. तुम्हाला जर वीजबिल भरण्यासाठी मेसेज आला असेल तर सावध व्हा. कारण, वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट मेसेज पाठवून संपर्क साधण्यात सांगून लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अशा प्रकारे वीजग्राहकांना लुटणारी टोळी राज्यात सक्रिय झाली आहे. बनावट मेसेज पाठवून ही टोळी ऑनलाईन गंडा घातला जात आहे. त्यामुळे तुम्हाला वीजबिल भरण्यासाठी आलेला मेसेज खरंच वीज कंपनीकडून आलाय का याची खात्री करा नाहीतर ही टोळी तुमचं अकाऊंट रिकामं करेल.

वीजग्राहकांची कशी होतो फसवणूक?
– महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना सिस्टीमद्वारे मेसेज येतो
– वीजबिल भरलेलं नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असा मेसेज पाठवतात
– असे मेसेज वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येतात
– बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल नंबरवरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवतात
– ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगतात
– ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यास मोबाईल हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास करतात
– फसवणूक टाळण्यासाठी 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *