महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : करोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे अखेर जी भीती वाटत होती तसेच घडले. बीसीसीआयने आयपीएलचा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवल्याचे जाहीर केले. तेव्हापासून आयपीएल पुन्हा एकदा स्थगित करावे लागणार अशीच चर्चा सुरू होती. अखेर बीसीसीआयने काल रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याचे समजते.
बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ही स्पर्धा एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता नाही. अर्थात बीसीसीआयकडून अद्याप यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएलमधील ८ संघांना आणि प्रायोजकांना याची कल्पना दिली आहे.