तब्बल तीन दशकांनंतर श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । श्रीलंका-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान संघाचा कर्णधार दासुन शनाकाची आगळीवेगळी रणनीती बघायला मिळाली. त्याने आपल्या गोलंदाजांकडून 50 पैकी 43 षटके ही फिरकीपटूंकडून टाकून घेतली. त्याची ही रणनीती यशस्वी ठरली असून, श्रीलंकेने चौथा सामना 4 धावांनी जिंकून तब्बल तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर म्हणजेच 30 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली. शतकी खेळी करणारा चरिथ असलंका या सामन्याचा मानकरी ठरला. 5 सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने 3-1 अशी विजयी आघाडी घेतल्याने शुक्रवारी होणारा अखेरचा सामना म्हणजे मालिकेतील केवळ औपचारिकता होय. श्रीलंकेने याआधी 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-1 फरकाने हरवले होते. त्यानंतर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सलग तीन एकदिवसीय मालिका गमावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *