शिंदे गटासमोर भाजपची अट, बंडखोर भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन करणार? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

 140 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । राज्यातील ऐतिहासिक राजकीय उलथापालथीदरम्यान विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी या घडामोडींवर एक सूचक ट्वीट केले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये आंबेडकरांनी प्रश्न विचारला आहे की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे का?


आंबेडकरांनी केलेल्या या ट्विटवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपने अशी कोणतीही अट घातलेली नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना आणखी काही आमदार आणि खासदारांचे समर्थन मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे जवळपास 8 ते 9 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. याशिवाय आणखी काही सेना आमदारांनीही गुवाहाटीच्या दिशेने कूच केल्याची माहिती समोर आली आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येऊन बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली. एवढेच नव्हे तर आपला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली. तथापि, आता शिंदे गट काय निर्णय घेतो, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *