राज्यातील राजकीय घडामोडींना वेग ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात परतण्याची शक्यता

 88 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ जून । एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार (shiv sena mla) फोडून मोठा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. 40 च्यावर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. (eknath shinde in guwahati). दरम्यान एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार होते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची भेट टळली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची प्रकृती उत्तम असल्याचे मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून समजते आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या (दि.24) राजभवनात परतण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. ते उद्या राजभवनात जाणार का याबाबत आज संध्याकाळपर्यंत डॅाक्टर निर्णय घेणार आहेत. राज्यपाल कोश्यारी यांची तब्बेत अत्यंत चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. सध्याच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर राज्यपाल राजभवनावर कधी परतनार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *