महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही..वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. मला आरोप प्रत्यारोपांचा वीट आलाय पण हीच वीट डोक्यात हाणणार अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे.(Chief Minister Uddhav Thackeray attacked the rebel Eknath Shinde maharashtra politics)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले, मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही..वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.
स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. संजय राठोडांवर वाईट आरोप झाले तर त्यांना सांभाळून घेतल. बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्यात काम सुरू आहे.
माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय. तुकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही. असं आव्हानच त्यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.
एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनाकडून खासदार आहे. शिंदेंसाठी मी काय कमी केलं?, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे षंढ नाही. आदित्यला बडवे म्हणायचे आणि स्व:ताचा पोरगा खासदार, त्यांना काय कमी केलं? नगरविकास खातं त्यांच्याकडं दिलं, अजून काय हवं होतं? हे सारं भाजपने केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल.
माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही. हे सारं भाजपने केलं आहे, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं. संजय राठोडांवर अनेक आरोप झाले. विचित्रं आरोप झाले. त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतलं, असं ते म्हणाले.
बाळासाहेबांचं माझ्याहूनही लाडकं आपत्य म्हणजे शिवसेना. ज्या शिवसेनेसाठी जीवही देईल असं जे म्हणायचे, तेच आज पळून गेले आहेत. जे निघून गेले. त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही. पण त्यांना मी काय कमी केलं होतं, असा भावनिक सवाल त्यांनी यावेळी केला.
आपल्या माथी अनेकदा पराभव आला आहे. पण फरक कोणता पडला नाही. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला तशी आत्ता परिस्थिती आहे अस समजा. कोण कसं वागल हे लक्षात ठेवण गरजंच आहे. यापूर्वीही लोकांनी सेनेशी गद्दारी केली आहे. शिवसेनेची मुळं माझ्यासोबत आहेत.
मी त्यादिवशी मनातलं सांगितल आजही मनमोकळ करत आहे. बंड झाल्यानंतरही शिवसेना सत्तेत आली. मन खचलं असेल तर हरलेली निवडणूक जिंकता येते. बुडते ती निष्ठा तरंगते ती विष्ठा, असंही ते म्हणाले