ठाकरे सरकार वाचवण्यासाठी थेट शिंदेनाच ‘आऊट’ करण्याचा प्लॅन ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । महविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांची रणनीती ठरली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कालच्या बैठकीत शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. सभागृहात शिवसेनेच्या आमदारांचं सभासदत्व रद्द झाल्यावर फ्लोअर टेस्टच्या संख्याबळाचं गणित बदलणार आहे. हे गणित सतत बदलत ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणार आहे. एकनाथ शिंदे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं तर राजकीय चित्र पलटवलं जाऊ शकतं

शिवसेनेने 46 पानांची याचिका विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. ज्यात एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्राचा आधार घेऊन त्यातील नमूद 34 आमदारांवर कारवाई करण्याची ही विनंती केली आहे. संविधानाच्या अनुछेद 10 नुसार ही कारवाई करण्याची मागणी केली गेली. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने तात्काळ बैठकीला हजर राहावे असा पक्षाने व्हीप काढला असतानाही बैठकीला गैरहजर राहणाऱ्या 34 जणांवर कारवाई करण्याची याचिका सेनेने गुरुवारी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *