देशातील हॉटस्पॉट जिल्ह्यांची यादी जाहीर ; महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा ‘ कोरोना हॉटस्पॉट’मध्ये समावेश

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रीती सूदन यांनी बुधवारी देशातील हॉटस्पॉट जिल्ह्यांची यादी जाहीर केली. यादीत महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, उर्वरित जिल्ह्यांचा नॉन हॉटस्पॉटच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचे १५ हून कमी रूग्णसंख्या असलेल्या तीन जिल्ह्यांचा हॉटस्पॉट क्लस्टर मध्ये समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉट ११ जिल्हे

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलढाणा

कल्स्टरसह हॉटस्पॉट ​जिल्हे

१५ हून कमी प्रकरणे असलेले जिल्ह्यांना या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. कोल्हापूर, पालघर, अमरावती चा त्यात समावेश आहे.

नॉन-हॉटस्पॉट जिल्हे

लातूर, सातारा, रत्नागिरी, उस्मानाबाद, जळगाव, सिंधुदूर्ग, रायगड, बीड, हिंगोली, जालना, धुळे, सोलापूर, अकोला, वाशिम, गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *