पिंपरी चिंचवड, सोशल डिस्टन्सिंग ची ऐशी तैशी, भाजी मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड

Loading

महाराष्ट्र 24 – पिंपरी-चिंचवड : प्रशासनआणि पोलिसांकडून वारंवर नागरिकांच्या आरोग्यासाठी सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार आवाहन करूनही गांभीर्यानं घेतलं जात नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमधील एक दृश्य समोर आलं आहे.  महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि पोलीस यंत्रणेशी समन्वयाचा अभाव यामुळे पुन्हा एकदा भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचा तर नागरिकांची फज्जा उडवला.

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी भाजी मार्केटमधील गर्दीची दृश्यं कॅमेऱ्यात कैद करून ती पोलीस प्रशासनाला दाखवली. त्यानंतर पोलिसांनी तिथे जमलेल्या नागरिकांवर कारवाई करत सर्वांना पिटाळून लावलं. हा संपूर्ण प्रकार केवळ महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि सूचना न पोहोचल्यानं घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली

नियमांचं उल्लंघन केल्यानं मागचे चार दिवस पिंपरीतील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजीपाला विक्रीवरील बंदी बुधवापासून हटवून मंडई सुरू करण्याचे आदेश दिले. नव्या आदेशा नुसार 11 ते 4 दरम्यान भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र पिंपरी शहरात आज पासून नाही, तर मोकळ्या मैदानांवर भाजीपाला विक्रीची व्यवस्था झाल्या नंतरच भाजीपाला खरेदी विक्री चालू होणार अशी माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली होती. नव्या आदेशाची सूचना नागरिकांपर्यंत न पोहोचल्यानं भाजी मंडईमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा भाज्या खरेदी करताना नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.दोन वेगवेगळ्या आदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. धक्कादायक बाब म्हणजे 4 दिवसानंतर भाजी मार्केट उघडणार आहे त्यामुळे गर्दी होणार हे माहीत असूनही पालिका प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून ही गर्दी रोखण्यासाठी किंवा गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे गर्दी घालवण्यासाठी पोलिसांना ऐनवेळी बळाचा वापर करावा लागला. महापालिका आणि पोलीस यांच्यात समनव्य नसल्यानं हा प्रकार घडल्याचं दिसून आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रशासनाच ढिसाळ नियोजन कारणीभूत ठरत असल्याचं आज पुन्हा एकदा बघायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link