लॉक डाउन नियम : सार्वजनिक ठिकाणी हे नियम पाळावेच लागतील

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तीन मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.

  • सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक आहे.
  • आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
  • कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये.
  • लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा.
  • दारु, गुटखा, तंबाखूची विक्रीवरील बंदीचे अत्यंत कठोरपणे पालन करण्यात यावे.

 

https://twitter.com/ANI/status/1250276720562688001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *