मालेगावमध्ये पूर्ण संचारबंदी लागू, पाच दिवस बँकाही बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात आत्तापर्यंत ३६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने इथल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मालेगाव शहरात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश मालेगावच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशानुसार, १५ एप्रिल सकाळी ७ वाजल्यापासून ३० एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. त्याचबरोबर १५ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत पाच दिवस बँकाही बंद ठेवण्यात येणार आहेत.

या संचारबंदी आदेशानुसार, मालेगाव शहरात भादंवि कलम १४४ (१) (३) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, विनाकारण फिरणे, उभे राहणे, एकाच ठिकाणी रेंगाळून राहणे अशा सर्व प्रकारच्या कृत्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार बुधवारी १५ एप्रिल, सकाळी ७ वाजल्यापासून ३० एप्रिल, रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. तसेच मालेगाव शहरातील सर्व बँका १५ एप्रिल ते १९ एप्रिल या पाच दिवसांच्या काळात बंद राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *