महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । मान्सूनही लहरी झाला आहे. जेथे वेळेआधी आला तेथे अनेक ठिकाणी खूप कमी बरसला. जेथे पोहोचलाच नाही तेथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. उदाहरणार्थ केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. पण पाऊस आतापर्यंत सरासरीपेक्षा ६०% कमी झाला. जम्मू-काश्मीरमध्ये तो पोहोचलाच नाही, पण तेथे पाऊस ११९% जास्त झाला आहे. हीच स्थिती राजस्थानची आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांत २३ जूनपर्यंत सरासरी २६.१ मिमी पाऊस होतो, तेथे ४६ मिमी झाला आहे. म्हणजे ७६% जास्त. संपूर्ण देशाबाबत बोलायचे तर मान्सूनचे आतापर्यंत सर्व राज्यांत आगमन झाले असते, पण सध्या ९ राज्यांत प्रवेश करू शकला नाही. तरीही देशभरात २३ जूनपर्यंतचा सरासरी पावसाचा १००% कोटा पूर्ण झाला आहे.
मान्सून भलेही कमी वेगाने पुढे सरकत असला तरी मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली आहे. देशातील १४३ प्रमुख धरणांत पाणीपातळी २३ जूनपर्यंत सरासरीपेक्षा २५% जास्त झाली होती. दक्षिण भारतातील जवळपास सर्व धरणांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाणी आहे. त्याचे मोठे कारण म्हणजे मुसळधार पाऊस. हाच ट्रेंड कायम राहिला तर धरणांतील पाणीपातळीचा अनेक दशकांचा विक्रम मोडू शकतो. तथापि, सध्या उत्तरेकडील राज्यांतील धरणांत पाणी कमी आहे.
धरणांची पाणीपातळी : 23 जूनची स्थिती
या राज्यांत जास्त
आंध्र प्रदेश+153%
बिहार+35%
महाराष्ट्र+34%
मध्य प्रदेश+25%
गुजरात+13%
राजस्थान+8%
या राज्यांत सध्या कमी
ओडिशा-41%
पंजाब-26%
हिमाचल-25%
झारखंड-20%
छत्तीसगड-9%
उत्तर प्रदेश-4%