महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ जून । सध्याची राजकिय परिस्थिती पाहता ,नको ते राजकारणी व नको ते राजकारण असे सर्व सामान्य माणसाला वाटणे साहजिकच आहे. वर वर पाहता पाहता तसे वाटते ही परंतु असाच विचार सर्वांनी केला तर आपल्याला जिवन जगणेच मुश्किल होईल कारण आग वेळेवर विझवली नाहीतर तर तिचे रुपांतर वाढतच राहते. ज्यामुळे सर्वच जळून खाक होतात. म्हणुन ज्यांना सांविधानिक मूल्ये आणी तत्त्वनिष्ठा याची जाण नाही अशा नालायकांना जनतेने धडा शिकवलाच पाहीजे .नाहीतर हे नालायक जनतेला घरात घुसून मारतील आणी पोलीस ही आपली तक्रार घेणार नाहीत. कारण शासन हे राजकारण्यां च्याच अखत्यारीत चालत असते. राजकारणी च आपले रोजची जिवन जगण्याची ध्येय धोरणे ठरवत असतात. शासन योग्य पद्धतीने काम करीत नाही तेंव्हा आपल्यावर अन्याय होत असतो. त्या वेळा आपण न्याय मागण्यासाठी राजकारण्यांकडे च मोठय़ा आशेने जात असतो. म्हणुन नको ते राजकारण आपला असे म्हणुन चालणार नाही . मात्र आपली पोटापाण्याची नोकरी धंदा करून शक्य होईल तितके राजकारण समजून उमजून योग्य त्या उमेदवाराला साथ दिली च पाहीजे. देशाचे जागरूक नागरिक म्हणुन ते आपले कर्तव्यच आहे. कोण्याही येड्या गबाळ्याचे ते काम नाही हे ही तेवढेच खरे आहे. म्हणुन आपल्याला शक्य असेल तर योग्य तो विचार करून त्यातल्या त्यात योग्य त्या राजकारण्याला साथ देण्यात गैर काय आहे? अहो .आपण माणूस म्हणुन विचार करावा नाही तर म्हणतातना पोट तर कुत्रे पण भरतात” .थोडक्यात काय ” जिवन तर प्राणी पण जगतात की” ! …….पी. के. महाजन.