महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. अशात आता नुकतंच राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर रविवारी घरी परतले आहेत. यानंतर लगेचच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी बराच वेळी त्यांची फोनवर चर्चा झाली. मात्र, यात राजकीय चर्चा काय झाली, याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.
अशात आता आज राज ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीबाबतही चर्चा झाली. बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे सध्या वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.