महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) भारताविरुद्धच्या (IND vs ENG) एकमेव कसोटी सामन्यासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पुढे ढकलावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघ (Indian Cricket Team) मालिकेत 2-1नं पुढे होता. आता 1 जुलैपासून मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघाने यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सचा संघात समावेश केला आहे. बिलिंग्स आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी न खेळलेल्या जेम्स अँडरसनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यामुळे आणखी कोणते खेळाडू या संघात आहे. त्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या खेळाडूंचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आलाय, कोणत्या स्टार खेळाडूंना संघात घेण्यात आलंय. ते जाणून घ्या…
इंग्लंड कसोटी संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रोली, बेन फॉक्स, जॅक लीच, अॅलेक्स ली, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू पॉट्स, ऑली पोप
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मयंक अग्रवाल.