चिंताजनक : पिंपरी-चिंचवडमध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीसह चौघांना करोनाचा संसर्ग

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : पिंपरी-चिंचवड शहरात आणखी चार जणांना करोना विषाणूची बाधा झाली असून यामध्ये एका चार वर्षीय चिमुकलीसह गर्भवती महिलेचाही समावेश आहे. याचबरोबर शहरातील करोना बाधितांची एकुण संख्या ४५ झाली आहे.इतर तीन जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, १२ जणांना करोनामुक्त करण्यात आलं असून ३३ जणांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. आज देखील शहरात चार जण करोना बाधित असल्याचे आढळले असून यात ४ वर्षीय चिमुकली आणि एका गर्भवती महिलेचा समावेश असल्याची गंभीर बाब समोर आली आहे . या दोघींवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित महिलसेह अन्य जणांना परिसरातील करोनाबाधित व्यक्तीमुळे करोनाची बाधा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. हे सर्व बाधित खराळवाडी आणि भोसरी परिसरातील आहेत. या ठिकाणचे काही भाग या अगोदरच पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत. मात्र, सर्व नागरिकांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *