कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । राज्य सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं असून काही वेळातच कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांची शेवटची कॅबिनेट बैठक असल्यांचही सांगितलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या बैठकीवर आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा (Phone discussion between Uddhav Thackeray, Sharad Pawar, Sonia Gandhi) झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतरते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ (Indication of Uddhav Thackeray’s resignation) शकतात, असंही सांगितलं जात आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आताच्या तिघांमध्ये झालेल्या फोनवरील संवादात नेमकं काय घडलं, हे कॅबिनेट बैठक संपल्यानंतरच आपल्याला कळू शकेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *