महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. शरद पवार यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. मला आयकर खात्याने प्रेमपत्र पाठवले आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये मी निवडणुकांना उभे राहताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रांमधील माहितीच्या अनुषंगाने मला ईडीने सगळ्या वर्षांसाठीच्या नोटीस आता एकत्र पाठवल्या आहेत. सुदैवाने या सगळ्याची माहिती माझ्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे ती माहिती द्यायला मला काही चिंता नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते. मात्र, आता आयकर खात्याची ही चौकशी कुठपर्यंत लांबणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.