‘प्याद्यालाही वजिराच्या ताकदीने खेळवता येतं!’ – नरेंद्र मोदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांचा गेम केल्याची चर्चा आहे. त्यावरच भाष्य करणारा एक व्हीडिओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे आणि त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे.

संदीप देशपांडे यांचं ट्विट
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे. या नरेंद्र मोदी बुद्धिबळाचा खेळ समजावत आहेत.

“आपली स्वत:ची एक ताकद असते. युनिक क्षमता असते. तुम्ही जर एखाद्या मोहऱ्याला घेऊन एखादी चाल केली. त्याच्या ताकदीचा योग्य उपयोग केला तर तो सर्वात शक्तिशाली बनतो. एवढंच नव्हे तर एक प्यादा ज्याला सर्वात कमजोर समजलं जातं, तोही सर्वात ताकदवान मोहरा बनू शकतो. गरज आहे फक्त योग्यवेळी योग्य चाल खेळण्याची, योग्य पाऊल उचलण्याची मग तो मग तो प्यादा चेसबोर्डवरच्या हत्ती, उंट, वजीरची ताकदही मिळवू शकतो”, असं नरेंद्र मोदी यांनी या व्हीडिओमध्ये म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *