6 सेकंदांत रिचवला एक लिटर सोडा, गिनीज बुकात झाली नोंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । कोणताही विश्वविक्रम करणे सोपे नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. गिनीज बुकात आपले नाव यावे यासाठी काहीही करण्याची अनेकांची तयारी असते. आता अमेरिकेतील एरिक बॅंडलॅंड्स बुकर या फूड ब्लॉगरचे उदाहरण घ्या ना…एक लीटर सोडा अवघ्या 6.08 सेकंदात पिऊन त्याने विश्वविक्रम केला आहे. साधारणपणे एक लीटर पाणी पिण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. मात्र, अवघ्या काही सेकंदांत एक लिटर सोडा प्यायल्यानंतरही त्याला काहीच त्रास झाला नाही. अलीकडेच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *