सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी वाढ ; आजपासुन सोने खरेदी महाग

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै ।आजपासून सोने खरेदी करणे महाग झाले आहे. सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांनी वाढवले आहे. केंद्रीय महसूल विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे. ड्युटी वाढल्याने तुम्हाला सोने खरेदी करणे महाग होईल.याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशालाही बसल्याचे दिसून येत आहे. सराफा तज्ञांच्या मते, सोने सुमारे 2500 रुपयांनी महाग होऊ शकते. आत्तापर्यंत सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्के होते, जे उपकर आणि इतर शुल्कांसह 10.75 टक्के होते, परंतु 5 टक्के वाढीसह ते आता 15.75 टक्के होईल. सरकारने अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात केली होती.

सोन्यावरील आयात शुल्क 10.75% वरून 15.75% पर्यंत वाढले आहे. सोन्यावर आयात शुल्क आणि जीएसटीसह एकूण 18.75% कर भरावा लागेल.
आयात शुल्क वाढवल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसून आला. एमसीएक्सवर आज सोने 1300 रुपयांच्या वाढीसह 51592 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जगभरातील अस्थिर शेअर बाजारांच्या परिस्थितीमुळे देशात सोन्याची मागणी वाढली आहे सध्या आहे. आयात बिलात सातत्याने वाढ होत असल्याने परकीय चलन साठ्यावरही परिणाम झाला आहे. हे पाहता सरकारने सोन्यावरील आयात शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परकीय चलन साठा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर आयात शुल्क तात्काळ प्रभावाने सोन्याची आयात कमी करेल. त्याचबरोबर मागणी अशीच राहिल्यास भाव वाढतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *