Uddhav Thackeray : “माझा राग मुंबईवर काढू नका” ; एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा साधला जनतेशी संवाद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै ।“एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मागच्या 11 दिवसांपासून एकनाथ शिंदे “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमचा गट हीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय”, असं त्यांनी वारंवार सांगितलं. पण आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. याशिवाय माझ्याशी असलेलं वैर मुंबईवर थोपवू नका, असं म्हणत मेट्रो कारशेड हलवू नका, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय.

“ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं, कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच मी अमित शाहांना सांगत होतो, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री व्हावा, आताची जोडगोळी अशीच अडची वर्ष झाला असतो.. पहिल्या अडीच वर्षात याचा नाहीतर त्यांचा मुख्यमंत्री जाला. मग आता असं का केलं.. लोकसभा विधानसभेत एकत्र होतो. मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं… आता जे केलात ते तेव्हाच केलं असतं तर मविआ जन्मालाच आला नसता.. पाठीत वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.. पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल.. पण मुंबईच्या पाठीत वार खुपसू नका”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात अहंकार नाही. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह उगाच रेटू नका. पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *