सोशल मीडियावरुन शिंदेंचे केले अभिनंदन, या माजी खासदाराची पक्षातून हकालपट्टी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आढळराव पाटील यांनी बंडखोर शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेतील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. अनेक मंत्री पक्षाला सोडून शिंदे गटात सामिल झाले आहे. त्यात आता पुण्यातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही पक्षाला घराचा आहेर दिल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. खेड तालुक्यात पंचायत समितीच्या राजकारणात आघाडीमध्ये दीड वर्षापूर्वी बंडाळी झाली होती. तेव्हा कुठलाच शिवसैनिक अथवा पक्षातील नेत्याने राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात आवाज नव्हता उठवला, असे आढळराव पाटील यांनी नुकतेच म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *