महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला असल्याने ते अध्यक्ष होणार असल्याचं निश्चित झालं आहे. उद्या म्हणजेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाचे राहुल नार्वेकर यांच्याविरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली.
सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.