राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । मागील महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदा जून महिन्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा पावसाची नोंद कमी झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात कोकणातील काही जिल्ह्यांना अलर्ट आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला होता. (heavy rain in maharashtra upcoming 5 days)

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान, या पावसाच्या सरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत कोसळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. २६ जूनपासून पावसाला सुरुवात होईल अशी माहिती मिळत होती. त्याप्रमाणे काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मात्र कोकणचा काही प्रदेश वगळता राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. जून महिन्यातील पावसाचा संभाव्य अंदाजही वर्तवण्यात आला होता. यामध्ये सामान्य किंवा सामान्य पाऊस भारताच्या वायव्य आणि मध्य भारतात पडेल तसेच असाच पाऊस उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही होण्याची शक्यता होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *