सोन्या-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – नवी दिल्ली, : कोरोना व्हायरस लॉकडाऊमुळे देशातील सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. दरम्यान बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती शुक्रवारी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या किंमती देखील कमी झाल्या आहेत. सर्वाधिक किंमतीवर पोहोचलेलं सोनं प्रति तोळा 964 रुपयांनी कमी झाल्यामुळे सोन्याची किंमत प्रति तोळा 45,964 रुपये इतकी झाली आहे. दरम्यान वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीने आजही नवीन रेकॉर्ड रचला. वायदे बाजारात सोन्याची किंमत 47,000 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती रेकॉर्ड रचत आहेत.

त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत 1090 रुपये प्रति किलोंनी कमी होत 42,460 रुपयांवर पोहोचली आहे. देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे देशातील सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. दिल्लीतील सराफा बाजारही यावेळी बंद आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम सोने व्यापारावर होत आहे. सध्या लग्नसमारंभ किंवा इतर सोहळे रद्द झाल्यामुळे सोन्याची मागणी देखील कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना वगळल्यास केंद्रीय बँका, फंड मॅनेजर्स, स्वतंत्र गुंतवणूकदार जगभरातील विविध एक्सचेंजवर सोन्याची खरेदी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे भारतातही गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *