महाराष्ट्र २४- ऑनलाईन – संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे. अनेक देश एकमेकांना मदत करीत आहेत. भारताही अन्य देशांना तत्परतेने मदत करीत आहे. असे असताना चीनने त्यांच्या कावेबाजपणाचा प्रत्यय देत पीपीई कीटमध्ये भारताची फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. चीनमधून आयात करण्यात आलेल्या एक लाख 70 हजार कोटींपैकी 50 हजार पीपीई कीट्स निकृष्ट आहेत.
डीआरडीओच्या ग्वाल्हेर येथील चाचणी केंद्रात चीनमधूल आलेल्या पीपीई किट्सची चाचणी घेण्यात आली. किटच्या दर्जा उत्तम असावा यासाठी काही मानकं ठरवण्यात आली आहेत. या मानकांच्या आधारे कीट्सची चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत सुमारे 50 हजार कीट्स निकृष्ट असल्याचे आढळले आहे. वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणारा चीन हा जगातील सर्वात प्रमख देश आहे. हिंदुस्थानला चीनकडून 6.5 लाख टेस्टिंग कीट्स लवकरच मिळणार आहेत. ग्वांझवू वोंडफो येथून 3 लाख तर झुहाई लिवजोन येथून 2.5 लाख रॅपिड ऍण्टीबॉडी टेस्टिंग किटस् येणार आहेत. याशिवाय एमजीआय शेनजेन येथून एक लाख आरएनए ऍक्स्ट्रेक्शन किटस् येणार आहेत. काल रात्री उशिरा या कंसाईनमेंटसाठी कस्टम क्लियरन्सही मिळालेले आहे.