महाराष्ट्र २४- ऑनलाईन -भारताच वेगवान गोलंदाज महोम्मद शमीने गुडघ्याला गंभिर दुखापत असताना देखील 2015 सालच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेवेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या सांगण्यावरून मी खेळलो असा दावा केला आहे. संपुर्ण विश्वकप दरम्यान माझ्या गुडघ्याला जखम होती, सामना झाल्यावर मी चालू देखील शकायचो नाही अशी माहिती शमीने इरफान पठाण सोबत केलेल्या इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये गप्पा मारत असताना दिली.
शमीने या सगळ्याचे श्रेय धोनीली दिले आहे, त्याने सांगीतले की धोनीमुळेच मला खेळत राहण्याची प्रेरणा मिळाली. शमी ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सेमिफायनल मध्ये खेळण्याची इच्छा नव्हती असे देखील म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वीच गुडघ्याच्या दुखापतीविषयी संघसहकाऱ्यांना कळवले. विशेष म्हणजे प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी मला असह्य वेदना जाणवत होत्या. परंतु संघ व्यवस्थापन आणि धोनी यांनी माझे प्रोत्साहन वाढवले, धोनीनी स्वत: माझ्याशी संवाद साधूमन माला धाडस दिले, त्यामुळेच मी सामना खेळू शकलो असे शमी म्हणाला.
रिशभमध्ये प्रचंड गुणवत्ता युवा यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या रिशभ पंतमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. केवळ तो माझा मित्र आहे म्हणून मी असे म्हणत नाही. केवळ आत्मविश्वारसाचा विषय आहे. ज्या दिवशी रिशभमध्ये आत्मविश्वाआस निर्माण होईल त्यानंतर तो धोकादायक क्रिकेटपूट होईल असे भाकीत शमीने केले.