महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. देशात सुरुवातीला 21 दिवसांसाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर पुन्हा वाढवलं. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण कमी झालं आहे. लॉकडाऊनच्या आधी कोरोनाचा प्रादुर्भाव 3 दिवसात दुप्पट होत असे. मात्र आता हेच प्रमाण 6.2 दिवसांपर्यंत गेलं आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाणापेक्षाही 19 राज्यांचे प्रमाण कमी आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दुप्पट होण्यास सहा ते सात दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. यामध्ये केरळने कोरोनावर नियंत्रण मिळवलं असून इथल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही आटोक्यात आहे. केरळ, उत्तराखंड, हरियाणा, लडाख, हिमाचल, चंदिगढ, पाँडिचेरी, बिहार, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मू काश्मीर, पंजाब, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.