काँग्रेस-राष्ट्रवादीचे हे मोठे नेते बहुमत चाचणीलाच गैरहजर, सभागृहात प्रवेश नाकारला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । आज शिंदे- फडणवीस सरकारसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. सध्या विधानभवनात बहुमत चाचणी (Floor Test) सुरू आहे. शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकारची स्थापना होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला. राष्ट्रवादीचे ५ आमदार बहुमत चाचणीसाठी सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत.

बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना काँग्रेस नेत्यांचा उशीर झाला. उशीर झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यांना प्रवेश नाकारला गेला. इतका महत्त्वाचा दिवस असताना नेत्यांना विधानभवनात यायला उशीर का झाला, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.

या आमदारांना प्रवेश नाकारला –

विजय वडे्टीवार, अशोक चव्हाण, संग्राम जगताप, धीरज देशमुख, दिशांत सिधिक्की

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *