महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । चांदीच्या दरात अचानक अडीच हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरात १४०० रुपयांची वाढ झालेली आहे. (Gold) सोने, चांदीचा सिझन स्लॅक असताना झालेली घसरण व वाढ गुंतवणूकदारांना लाभाची व फायद्याचीही आहे. चांदीत (Silver) गुंतवणुकीसाठी ही चांगली संधी आहे. यंदा चांदी ६९ हजारांपर्यंत गेली होती. जानेवारीपासून प्रथमच चांदी ६० हजारापर्यंत खाली आली आहे. (jalgaon news Silver price drop but Gold price however)
येत्या १० जुलैला आषाढी एकादशी आहे. (Jalgaon News) तोपर्यंत लग्नाचे तीन ते चार मुहूर्त आहेत. असे असले तरी त्यानंतर चार महिने लग्नसराई सारखे मुहूर्त साधून होणारे कार्यक्रम आगामी काळात नाही. यामुळे सोने, चांदी बाजारात सध्या शांतता आहे. असे असताना चांदीच्या दरात सोमवारी तब्बल अडीच हजारांची घसरण होऊन सोने ६० हजार रुपये प्रतीकिलोपर्यंत खाली आले. ही गुंतवणूक करणाऱ्यांना चांगली संधी आहेत. मात्र सोन्याच्या दरात १४०० रुपयांची वाढ झाली.