‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका’; एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचत राज्यात शिंदे सरकार आलं आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकलाय. विश्वासमत जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात केलेलं भाषण चांगलंच गाजलं. आपल्या भाषणात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेलाही शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावररुन आज उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. तर रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा (Mercedes) स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रत्यु्त्तर शिंदे यांनी ठाकरेंना दिलंय.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी स्वत: उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटाच लावलाय. आजही शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता, असा टोला लगावला. एकनाथ शिंदेंचं भाषण सुरु असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं की अपघात तर होणार नाही ना. काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *