मला कुणाच्या.. ; अपात्रतेच्या कारवाईत नाव वगळण्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पक्षात बंडखोरी करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने आमदारांनी बडखोरी करणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. आदित्य ठाकरे दोन्ही दिवशी विधानसभेत हजर होते. दरम्यान, शिंदे गटाने व्हीपचं उंल्लधन केल्याच्या कारवाईत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं नाव वगळलं आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सध्या आम्ही फक्त शिवसैनिकांचा आवाज ऐकत आहोत. सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. बंडखोरांनी एकदा आरशात पाहावं. आमचा व्हिप अधिकृत असून त्यानुसार कारवाई होईल. नाव वगळण्याविषयी विचारले असता, मला कुणाच्याही खास प्रेमाची गरज नसल्याचे आदित्य म्हणाले. राज्यातील एकूण परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचा दावाही ठाकरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *