महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.. मुंबईतील मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिकेतील कंट्रोल रुमचा आढावा घेणार आहेत.