महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ढगफुटी झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात डोंगरावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला. या घटनेदरम्यान गुहेजवळ सुमारे 10-15 हजार भाविक उपस्थित होते. काही जण त्यांच्या तंबूसह वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 लोकांच्या मृत्यू झाला आहे. तर आणखी 35 ते 40 भाविक अडकल्याची माहिती मिळत आहे.
पवित्र गुहेजवळून एक ते दोन किलोमीटर अंतरावर ढगफुटी झाली आहे. डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने भाविकांचे सुमारे 25 तंबू आणि तीन लंगर वाहून गेले. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून, सेनेचे जवान, जम्मू-काश्मीर पोलिस, NDRF, ADRF, ITBP चे जवान अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीने प्रयत्न करत आहे.