महावितरणचा शॉक : कोळसा, इंधन महागल्यामुळे दरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । वीजनिर्मितीसाठीच्या कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर या ५ महिन्यांच्या वीज बिलांत इंधन समायोजन आकार वाढून येईल. या ५ महिन्यांत राज्यातील पावणेतीन कोटी ग्राहकांवर ६.२५ हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना ६५ रुपये वाढ होईल, तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना १४५ रुपये अधिक मोजावे लागतील. विजेच्या दरवाढीपेक्षाही वाढीव इंधन समायोजन आकारामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे.

महावितरणने एप्रिल २०२० पासून वीज बिलातील इंधन समायोजन आकार बंद केला होता. मार्च २०२२ ते मे २०२२ या ३ महिन्यांच्या वीज बिलांत १५ ते २० पैसे प्रतियुनिट इंधन आकार वसूल केला. आता जून ते ऑक्टोबर २०२२ या ५ महिन्यांच्या वीज बिलांवर इंधन समायोजन आकार वाढवला आहे. घरगुती, थ्रीफेज, पाणीपुरवठा योजना, कृषी, पथदिवे, इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन आदी वीज जोडणी असलेल्या ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *