महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । राज्यात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघरमध्ये गेल्या 24 तासांत सरासरी 64 मिमी पाऊस झालाय. तर ठाणे जिल्ह्यातही गेल्या 24 तासांत 76.4 मिमी पाऊस झालाय. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात मुंबईतील कुलाबा येथे 52.8 मिमी तर सांताक्रूझ येथे 49.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड आणि रत्नागिरीतील काही नद्या इशारा पातळीवरून वाहात आहेत.
हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात 8 जुलैपासून 11 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळावे तसेच पर्यटन स्थळे धबधबे या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.