महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी उद्धव यांचा ‘माफिया’ म्हणून केलेला उल्लेख या बंडखोरांच्या जिव्हारी लागला आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला थेट इशारा देत आम्हाला सत्तेची पर्वा नसल्याचे म्हटले.
श्रद्धा नाही असे समजू नका : आ. गायकवाड
शिवसेनेच्या बंडखोरांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्तांतर घडवले. पण भाजपमधील नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू लागल्याने काही बंडखोर व्यथित झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर श्रद्धा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर होणारी टीका सहन करणार नसल्याचा थेट इशाराच भाजपला दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी उद्धव यांचा ‘माफिया’ म्हणून केलेला उल्लेख या बंडखोरांच्या जिव्हारी लागला आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला थेट इशारा देत आम्हाला सत्तेची पर्वा नसल्याचे म्हटले.
सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला.
यावर बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला. किरीट सोमय्यांनी असे काही समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजप – शिवसेना युती म्हणून काम करतोय. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धवसाहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशारा गायकवाड यांनी दिला. यामुळे मात्र भाजप व शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत.
गुरुवारी (७ जुलै) भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये ‘मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केले,’ असे ते म्हणाले. या ट्वीटवरून शिंदे गटातील अनेक बंडखोर नाराज झाले आहेत.
श्रद्धा नाही असे समजू नका : आ. गायकवाड
सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला. यावर बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला. किरीट सोमय्यांनी असे काही समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजप – शिवसेना युती म्हणून काम करतोय. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धवसाहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशारा गायकवाड यांनी दिला. यामुळे मात्र भाजप व शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत.
उद्धव ठाकरे रागाने बोलत असतील : राजेश क्षीरसागर
आम्ही राजकीय दिशा बदलली आहे. परंतु, निष्ठा बदलली नाही. विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोडे रागाने बोलत असतील. पण भविष्यात ते समजून घेतील. ते आमचे दैवत आहेत. परंतु, आमच्या दैवताला बाहेर काढून चुकले, असे मत कोल्हापूरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
केसरकर, अब्दुल सत्तार यांचीही नाराजी
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही सोमय्या यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. ‘उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये,’ असे केसरकर म्हणाले. तर, किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरे यांना माफिया संबोधणे चुकीचे आहे, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले होते.