“नियतीचा खेळ ! मनसेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले ; मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे जरी एकमेकांचे भाऊ असले तरी राजकीय जीवनात ते एकमेकांवर टीका करताना दिसतात. आताही शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना मनसेकडून शिवसेनेला डिवचलं जातंय. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि आदित्य यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना”, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

मनसेची फेसबुक पोस्ट
मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. आणि आदित्य यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना”, अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. आधी सूरत मग गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा मार्गे विधीमंडळ असा या शिंदे गटाचा प्रवास राहिला. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, असं म्हणत त्यांनी शिवसेना पक्षासह चिन्हावरही दावा ठोकला. या सगळ्याचा फैसला आता न्यायालयात होणार आहे. 11 तारखेला शिंदे गटातील आमदारांबाबत निर्णय होणार आहे. या सगळ्या परिस्थितीवर मनसेकडून निशाणा साधण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *