ENG vs IND, 2nd T20, Playing 11 : दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन ; कशी असू शकते अंतिम 11?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात टी20 मालिका सुरु असून तीन सामन्यांत्या मालिकेत भारत 1-0 च्या आघाडीवर आहे. दरम्यान आज बर्मिंगहमच्या मैदानात दुसरा टी20 सामना रंगणार आहे. नुकताच कसोटी सामना खेळल्यामुळे भारताचे दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यात विश्रांतीवर होते. पण आता दुसऱ्या टी20 साठी माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), ऋषभ पंत (Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Japrit Bumrah) आणि रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) संघात परतल्याने आज त्यांना संघात नक्कीच संधी मिळू शकते. दरम्यान यामुळे टी-20 मध्ये खेळलेल्या काही खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यावेळी अर्शदीप सिंह, ईशान किशन, अक्षर पटेल यांना संघातून वगळलं जाऊ शकतं. तर नेमकी भारताची अंतिम 11 कशी असू शकते, यावर एक नजर फिरवूया…

भारताची संभाव्य अंतिम 11

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

आज सामना होणाऱ्या एजबेस्टनच्या मैदानात सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना चांगली गती मिळून विकेट मिळतात. पण जस-जसा सामना पुढे जातो पिचवर फलंदाजी करणं अधिक सोपं होतं. यामुळेच याठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. या मैदानावर टी20 सामन्यांत सरासरी स्कोर 160 रन इतका असून बहुतांश वेळी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेऊ इच्छित असतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *