महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटिसीसंदर्भात सोमवार, ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सरकारचा विश्वासदर्शक ठराव हा न्यायालयाच्या आदेशास अधीन असल्याचे न्यायालयाने पूर्वीच्या सुनावणीत स्पष्ट केले होते. एकूणच न्यायालयाच्या निवाड्यावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.