डेंगीचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । राज्यात जून अखेरपर्यंत डेंगीच्या एक हजार १४६ रुग्णांचे निदान झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक ३०५ रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याचे आढळून आले आहे. डेंगीची रुग्णसंख्या वाढत असली तरी राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासा देणारी बाब आहे. पुण्यात असलेली लोकसंख्या आणि डेंगीच्या तपासण्यांची संख्या यांचे प्रमाण पाहता निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुणे जिल्ह्यात आढळलेल्या ३०५ रुग्णांपैकी पुणे शहरात सर्वाधिक म्हणजे १४७ रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीणमध्ये १३७ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २७ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर असून, या ठिकाणी महापालिकेच्या हददीत ५२ आणि ग्रामीण भागात १०५ असे एकूण १५७ रुग्ण आढळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदूर्ग असून, येथे ९२ रुग्ण आढळले आहेत. राज्यात पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग येथे डेंगीचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या १४७ रुग्ण आढळले असल्यामुळे महापालिकेकडून काळजी घेण्यात येत आहे. यापैकी जून महिन्यात १४६ संशयित आढळले असून, यातील १७ जणांचे निदान झाले आहे. या वर्षी महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने ४७० सोसायट्यांना व व्यावसायिक मिळकतींना डेंगी डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी नोटीस दिली आहे. त्यापैकी ५७ नोटिसा या जून महिन्यात देण्यात आल्या आहेत. महापालिकेने १७ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *