पिंपरी-चिंचवड ; सुमारे निम्मे शहर सीलबंद झाले आहे.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पिंपरी – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिसांनी रुग्ण आढळलेले शहरातील भाग व रस्ते बंद केले आहेत. त्यात शनिवारपासून (ता. १८) चार रस्ते आणि चार पूल रहदारीसाठी बंद केले आहेत. अशा पद्धतीने सुमारे निम्मे शहर सीलबंद झाले आहे.

दापोडी-बोपोडी मुळा नदीवरील पूल : पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीवरील गाव म्हणजे दापोडी. हा भाग सील केलेला असूनही नागरिकांची ये-जा सुरूच होती. परिणामी शुक्रवारी मध्यरात्रीपासून रहदारीसाठी पूल बंद करण्यात आला. या पुलावरून खडकी बाजार, रेल्वे स्टेशन, औंध व पुण्यात जाणे सोयीचे होते.
दापोडी-सांगवी पवना नदीवरील पूल : जुनी व नवी सांगवी, औंध गाव, बाणेर, औंध जिल्हा रुग्णालय, लष्कराचा औंध कॅम्प, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडीकडे जाण्यासाठी पुलाचा वापर केला जातो. दापोडी रेल्वे स्टेशन, सीएमई, खडकी बाजारसह पुणे-मुंबई महामार्गाने जाण्यासाठी सांगवीकरांना पूल सोयीचा आहे. दापोडी-पिंपळे गुरव पवना नदीवरील पूल : नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील नागरिकांना पुणे, खडकी बाजार व रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी पुलाचा उपयोग होतो. तर या पुलावरून दापोडीकरांना पिंपळे सौदागर, नवी सांगवीत जाणे सोयीचे आहे. आता नाशिक फाटा मार्गे म्हणजे पाच किलोमीटर वळसा घालून जावे लागतंय.

हे रस्ते बंद

बोपोडीतील भाऊ पाटील रोड ते दापोडीतील शिवाजी महाराज पुतळा रस्ता
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते स्मशानभूमी रस्ता
नेहरूनगर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाजवळील गोकूळ हॉटेल ते गवळी माथा रस्ता
भोसरीतील गव्हाणे पेट्रोल पंप ते दिघी रस्त्यावरील सिद्धेश्‍वर स्कूल रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *