दूरदर्शन ने मोडले सगळे विक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ८०च्या दशकातील रामायण आणि महाभरत या मालिका दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा दाखवण्यात आल्या. या मालिकांनी चाहत्यांच्या मनवार राज्य केल्याचे दिसत आहे. या मालिकांचे पुन:प्रक्षेपण सुरू झाल्याने २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी वाहिनी सर्वाधिक पाहिली गेलेली वाहिनी ठरली होती. आता पुन्हा एकदा डीडी वाहिने इतर वाहिन्यांना मागे टाकत पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.नुकताच बार्कने २०२०मधील १४व्या आठवड्यातील टीव्ही रेटिंग लिस्ट जाहिर केली आहे. सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांच्या यादीमध्ये पुन्हा दूरदर्शन पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दूरदर्शनवरील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ‘रामायण’ ही आहे तर ‘महाभारत’ पहिल्या पाच मालिकांच्या यादीमध्ये आहे.


Broadcast Audience Research Council-Nielsen ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीनुसार डीडी नॅशनल वाहिनीचा प्रेक्षकवर्ग १४व्या आठड्यात १.९ बिलियन पेक्षा जास्त आहे. यापूर्वी १३व्या आठवड्यात (२८ मार्च ते ३ एप्रिल) १.५ बिलियन एवढा होता. या आढवड्यात डीडी नॅशनलने स्वत:चा विक्रम मोडून सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या वाहिनींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाच स्थान पटकावले आहे.

 

२१ ते २७ मार्च या काळात हिंदी मनोरंजनाच्या वाहिन्यांमध्ये डीडी पहिल्या १० मध्ये देखील नव्हते, पण २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी वाहिनी सारे विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान पटकावले होते. आता दूरदर्शनची लोकप्रियता कायम असल्याचे दिसत आहे. दूरदर्शनने ट्विट करत १४व्या आठवड्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले असल्याचे सांगितले आहे.

प्रेक्षकांच्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिका प्रदर्शित करण्यात आली होती. याशिवाय ब्योमकेश बक्षी, श्रीमान श्रीमती, जंगल बुक, सर्कस आणि शक्तीमान या इतर मालिकांचे पुन:प्रक्षेपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *