प्रीपेड ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; ३ में पर्यंत रिचार्ज न करताच मारा मनसोक्त गप्पा,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन –  नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये तुमचं शहर बंद आहे याचा परिणाम तुमच्या गप्पांवर होणार नाहीए. जर तुमच्याकडे प्रीपेड मोबाईल असेल आणि त्याची वॅलिडीटी संपणार असेल तर काही काळजी करु नका. कारण मोबाईल कंपन्या तुमची काळजी घेणार आहेत. रिचार्ज संपल्याने तुमचा फोन कट होणार नाही. कंपन्या तुमचं कनेक्शन सुरुच ठेवणार आहेत. तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज लागणार नाही. लॉकडाऊनच्या वाढलेल्या मर्यादेत ग्राहक टीकून राहावा यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत.

अनेक मोबाईल कंपन्यांनी आपल्या प्रीपेड ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३ मे पर्यंत लॉकडाऊन संपला तर तुमचे कनेक्शन बंद होणार नाही. सर्व प्रीपेड ग्राहकांची इनकमिंग कॉल सेवा सुरुच राहणार आहे. ‘झी बिझनेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

डिजीटल प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त ग्राहक एटीएम, पोस्ट कार्यालय, किराणा दुकान, मेडीकलमध्ये जाऊन रिचार्ज करत आहेत. पण आताही ३ कोटी ग्राहकांनी लॉकडाऊनमुळे रिचार्ज केले नसल्याचे भारती एअरटेलने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या सर्वांची मर्यादा देखील ३ मे पर्यंत राहणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *