महाराष्ट्र २४- ऑनलाईन । धारवंटा। विशेष प्रतिनिधी ! आकाश शेळके – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या 3 मे पर्यंत लॉक डाऊन घोषित केल्यामुळे , कामगार वर्गास काही ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो, अशीच एक घटना बीड जिल्ह्या तील गेवराई तालुक्यातील धारवंटा येथे झाली . ऊस तोड कामगार जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्या तील गेवराई तालुक्यातील धारवंटा या गावांमधील महादेव शेळके हे एका ऊस तोड टोळीचे मुकादम आहेत काल शासनाच्या निर्णयानंतर ऊस तोड कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली त्यानंतर धारवंटा मध्ये ऊसतोड मजूर आले असता करोना चा धोका आपल्या गावाला होऊ नये यासाठी महादेव शेळके यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतात मजुरांची राहण्याची सोय केली आणि सोशल डिस्टन्स च पूर्णपणे पालन केले आणि गावातील लोकांसाठी एक आदर्श दिला.