लॉक डाऊनमुळे रस्ते वाहतुकीबरोबरच उद्योगधंदेदेखील बंद असल्याने; पेट्रोल-डिझेलच्या मागणीत घट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन ।मुंबई । विशेष प्रतिनिधी ! देशात कोरोना विषाणूमुळे जाहीर केलेल्या लॉक डाऊनमुळे एकूण इंधनाच्या मागणीत 5.6 टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोलच्या मागणीत 9 टक्क्यांनी आणि डिझेलच्या मागणीत 6.1 टक्क्यांनी घट झाली असल्याचे समोर आले आहे. द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेकारीमुळे ही बाब समोर आली आहे. लॉक डाऊनमुळे रस्ते वाहतुकीबरोबरच उद्योगधंदेदेखील बंद असल्याने ही मागणी कमी झाल्याचे कळते.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद असून देशातील उद्योगधंदेदेखील बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे इंधन विक्री 50 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले आहे. राजधानी दिल्लीचे उदाहरण द्यायचे तर दिल्लीत इंडियन ऑईल कॉर्पारेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून 90 टक्के इंधन पुरवठा करण्यात येतो. त्यांच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत लॉकडाऊनमुळे इंधन विक्री 50 टक्क्यांनी घरसल्याचे कळते. ज्यात प्रामुख्याने पेट्रोलची विक्री 64 टक्क्यांनी आणि डिझेलची विक्री 61 टक्क्यांनी घसरल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसाच्या आकडेवारीवर एक नजर टाकली असता दिल्लीत डिझेलची विक्री गेल्यावर्षीच्या तुलनेत 61 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर पेट्रोल आणि जेट इंधनाच्या विक्रीतही घसरण झाली असून अनुक्रमे ही घसरण 64 आणि 94 टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link