महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । पुणे मेट्रोचं काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे आता लवकरच पुणे मेट्रो वनाज ते शिवाजीनगर असा प्रवास करणार आहे. वनाज ते शिवाजी नगर न्यायालय या मार्गावर जोरात काम सुरु होतं. याच मार्गावरील व्हायाडक्ट म्हणजेत दोन खांबांना जोडण्याचं काम पुर्ण झालं आहे. पुण्यातील मेट्रोचा हा महत्वाचा टप्पा मानल्या जात होता. त्यामुळे लवकरच प्रवासी सेवा सुरु करण्याच्या तयारी मेट्रो प्रशासन आहे.
सुरुवातीला वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रोचं काम पुर्ण झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटनही करण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे मेट्रोच्या कामाला वेग आला. प्रत्येक परिसरात सतत काम सुरु होतं. त्यामुळे आता लवकरत पुणेकरांना वनाज ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रवास करता येणार आहे.