महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर सलग दोन दिवस घसरण झाली आहे. आज देखील सोन्याच्या दरात 201 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आज स्वस्तात सोनं खरेदीची संधी आहे. चांदीच्या दरातही आज घसरण झाली आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50477 रुपये प्रति दहा ग्रॅम असा खुला झाला आहे. काल शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 50678 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. म्हणजेच आज सोन्याचा दर 201 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे.
आज चांदीचा दर 55230 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 55563 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर प्रतिकिलो 333 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे.