सीएनजी कार वापरत आहात? उत्तम मायलेज साठी या टिप्स फॉलो करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै ।

एअर फिल्टर स्वच्छ ठेवा
सीएनजी कारमध्ये चांगला मायलेज मिळविण्यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे एअर फिल्टरची चांगली काळजी घेणे आवश्‍यक आहे. प्रत्येक 5 हजार किमीच्या रेंजनंतर युजर्सनी एअर फिल्टर बदलने आवश्‍यक आहे. एअर फिल्टर बदलण्यामुळे हवेच्या तुलनेत सीएनजी हलकी होते. चांगल्या मायलेजसाठी हवा आणि सीएनजीचा रेशो समान असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे एअर फिल्टरला साफ ठेवले पाहिजे. त्याला वेळोवेळी बदलले पाहिजे.

स्पार्क प्लगला बदला
सीएनजी कारचे इग्निशन टेंपरेचर पेट्रोल कारपेक्षा जास्त असते. त्यामुळे सीएनजी कारमध्ये दमदार स्पार्क प्लगचा वापर करणे आवश्‍यक असते. कारमध्ये एकाच कोडच्या स्पार्क प्लगचा बरोबर सेट लागलाय की नाही, हे बघणे आवश्‍यक असते. कारची हीट रेंजदेखील कंपनीनुसार असणे आवश्‍यक असते. चांगल्या स्पार्कपासून सीएनजी आणि हवेचे मिक्स्चरचे चांगले इग्निशन होत असते. यामुळे कारचा मायलेज चांगला होत असतो.

टायरचे प्रेशर तपासा
टायरचे प्रेशर नेहमी तपासले पाहिजे. टायरचे योग्य प्रेशर केवळ मायलेजच वाढवत नाही तर, युजर्सच्या सुरक्षेसाठीही ते आवश्‍यक असते. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये खासकरुन टायरचे प्रेशर तपासले पाहिजे. टायरमध्ये हवा कमी असल्यास कारवर जास्त दबाव निर्माण होत असतो. त्यामुळे जास्त सीएनजी लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *